शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास विभागाच्या नावात ‘रोजगार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:10 IST

नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत.

ठळक मुद्देशासनाचे आदेश: नामकारणामुळे संभ्रम दूर होण्याची शक्यता

नाशिक: तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या विभागाचे आता नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहेत.राज्यात १९९७ मध्ये ‘रोजगार व स्वयंरोजगार’ विभाग तयार करण्यात आला होता. तरुणांना नोकरी तसेच स्वयंरोजगाराची संधी देणाऱ्या या विभागात तरुणांची नावे नोंदली जात होती. त्यावेळी शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने नावे नोंदविण्याला प्राधान्हही दिले जात होते. या विभागाच या माध्यमातून अनेकांना नोकरीच्या संधी देखील मिळालेल्या आहेत.२०१५ मध्ये शाासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एका आदेशान्वये या विभागाचे नाव ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ असे करण्यात आले. तरुणांनामध्ये असलेल कौशल्याचा विकास करून त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहीत तसेच संधी देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, या विभागाच्या अखत्यारीतील सर्व संस्था त्सेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या नावात रोजगार हा शब्दच नसल्याने रोजगार आणि स्वयंरोजगार याा बाबींशी संबंधित विभाग कोणता याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने आता त्यामध्ये ‘रोजगार‘ शब्द समाविष्ट करण्यात आला आहे.‘कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग’ असे या विभागाचे आता नामकरण करण्यात आले आहे. गेल्या जुलैमध्येच याबाबतच्या बदलाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली होती. त्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले.रोजगाराची शाश्वती नाहीच‘कौशल्य विकास व उद्योजकता’ विभागात ‘रोजगार’ शब्द जोडण्यात आला असला तरी त्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतीलच याविषयी शंका आहे. स्वयंरोजगारातून रोजगार अशीच या मागणी संकल्पना असल्यानेच नामकरण करण्याच आले असल्याची चर्चा आहे. नामकरण केवळ प्रशासकीय सोयीच्या संकल्पनेसाठी करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक