शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डेपो एकमधील कामगारांना अधिकाऱ्यांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:27 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभाग आणि डेपोंमध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कामगार काम करीत असून, याचा सर्वाधिक फटका डेपो क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. कामगारांच्या राजकीय हालचालींचे केंद्र असल्यामुळे या डेपोतील काराभाराकडे अधिकारीही काणाडोळा करीत असल्याचा फायदा वरिष्ठांच्या खुर्चीवर बसलेले कामगार घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो स्तरावर अनेक कर्मचारी हे असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी कामे करीत असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी असल्याचे भासवत इतर कर्मचाºयांना वेठीस धरू लागल्यानंतर याबाबतची तक्रार वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे. त्यानुसार आता अशा कर्मचाºयांची माहिती मिळविली जात असून, कोणत्या जागांवर किती कर्मचारी काम करीत आहेत, याची माहिती घेतली जात आहे.नाशिक डेपो-१ मध्ये अधिकारी भासविणाºया कर्मचाºयांकडून होणारा उपद्रव आणि त्यामुळे इतर कर्मचाºयांना येणारा कामाचा ताण यामुळे अनेकदा पीडित कर्मचाºयांनी तक्रारी नोंदविलेल्या आहेत. तात्पुरत्या चौकशी आणि नोंदी घेण्यात आल्या; मात्र नेत्यांच्या दबावामुळे अशा कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई आजवर होऊ शकलेली नाही. कोणताही अधिकार नसतानाही संपूर्ण डेपोवर अधिकार गाजविण्याºया काही कर्मचाºयांमुळे इतर कर्मचारी भयभीत असल्याचे येथील एका वरिष्ठ कामगार प्रतिनिधीने अधिकाºयांकडे तक्रार केलेली आहे. मात्र, अजूनही कारवाई होत नसल्याने संबंधित कर्मचारी डेपोवर वर्चस्व राखून आहे़वरिष्ठ नसतानाही खालच्या कामगारांवर अरेरावीमहामंडळाच्या नाशिक डेपोच्या कारभाराविषयीच्या अनेक तक्रारी असून, अगदी कर्मचाºयांची वर्तणूक ते चोरीच्या घटनांमुळे डेपोंचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथील सुरक्षा आणि दक्षता विभागाकडून अनेकदा गैरप्रकार प्रकरणी जाबजबाब नोंदविण्यात आले असून, काही गंभीर प्रकरणी पोलिसांनादेखील पाचारण करावे लागलेले आहे. त्यामुळे डेपोंचा कारभार नेहमीच संशयाच्या भोवºयात राहिला आहे. आता अधिकारी या गैरप्रकारांना कसा आळा घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकNashikनाशिक