शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भगुर बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 13:35 IST

काही दिवसांपुर्वीच नव्याने बांधलेल्या भगुर बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परीसरातील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले

ठळक मुद्देशासनाने एक कोटी खर्च करत भगुर बसस्थानकाचे नुतनीकरणठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहेस्वच्छता ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहे.

नाशिक: काही दिवसांपुर्वीच नव्याने बांधलेल्या भगुर बसस्थानकात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परीसरातील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून एसटी महामंडळाने लक्ष देऊन कायमस्वरूपी सफाई कामगार ठेवून स्वच्छता ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहे.    शासनाने एक कोटी खर्च करत भगुर बसस्थानकाचे नुतनीकरण करुन काही दिवसांपुर्वीच या बसस्थानकाचे उद्घाटन झाले. परंतु येथील साफसफाई व पाणीपुरवठा सुविधांकडे कोणाचे लक्ष नसून बसस्थानक आवारात ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे तसेच आवारातील शौचालयातील व बेसिंगमधील नळ चोरीला गेले आहे. त्याचप्रमाणे शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली असल्यामुळे प्रवासांकडून याचा शुन्य वापर होत आहे. याठिकाणी सफाई कामगार नसल्याने स्वच्छताच होत नसून बस आवारात चारही बाजुने बस वाहकाला बस बाहेर काढताना कसरत करावी लागते. सध्या एकच प्रवेश द्वारातुन वाहतूक होत असल्यामुळे याठिकाणी वाहतुककोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था नसल्याकारणाने बसस्थानकांचे वैभव एक महिन्यात लोप पावत चालले आहे. बसस्थानकात सर्वच सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान भगुर बसस्थानकातुन सिन्नर, नाशिक, इगतपुरी तालुक्यातील विविध गाव शहरात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते तरीही एसटी महामंडळ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे असाच प्रकार सुरू राहिला तर नवीन बसस्थानकानकाचे वैभव लवकर नष्ट होईल अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.       शासनाने नवीन उत्कृष्ट बसस्थानक बांधून दिले असून देखील याठिकाणी महामंडळाकडून प्रवाशांना चांगली उपलब्ध होत नाही. बसस्थानकातुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात त्याना पिण्यासाठी पाणी नाही तसेच शौचालय दुर्गंधीमुळे याठिकाणी उभे राहणेही कठीण आहे. त्यामुळे महामंडळाकडून येथे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.विजय सोनवणे, प्रवासी 

टॅग्स :Nashikनाशिक