शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या प्रकल्पांपेक्षा समस्यामुक्तीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:47 IST

नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. शहरातील विकास करण्याबरोबरच नाशिकमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मनातील कल्पना सांगितल्या.

प्रश्न : महापौर म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्यासमोर कोणती आव्हानं आहे?कुलकर्णी : शहर प्रचंड वाढते आहे. त्यामुळे महापालिकेची जबाबदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच महापालिकेच्या अनेक मर्यादा आहेत. उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत. नागरिकांना तोषीस लागू न देता महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्याचा परिणाम नागरी कामांवर होतो. नागरिकांना मूलभूत समस्या सोडविण्यात अडचणी येतात. आज महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि सुरूच राहतील, परंतु नागरिकांच्या दैनंदिन समस्या सुटण्याचे मोठे आव्हान आहे.महापौर म्हणून शहरातील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य असेल?कुलकर्णी : नाशिक शहरात स्वच्छतेची समस्या मोठी आहे. आज शहरात डेंग्यू किंवा अनेक आजार होत आहेत. त्यामुळे अस्वच्छता हे मुख्य कारण आहे. यापूर्वी मी साडेचारशे ब्लॅक स्पॉट नष्ट केले होते. मात्र पुन्हा ते सुरू झाले. शहरात ६० टक्के भागांत स्वच्छता होत नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. एकट्या आरोग्याधिकाऱ्याकडून काम होत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची पुनर्रचना केली जाईल. नाशिकचे सिंगापूर किंंवा असे अन्य काही प्रकल्प राबविण्यास दुय्यम स्थान आधी नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रारंभ दिले जाईल. त्याचप्रमाणे फाळके स्मारकासह बंद अवस्थेत असलेले प्रकल्प सुरु करण्यात येतील.नगरसेवकांची कामे महत्त्वाचीगेल्या तीन वर्षांत अनेक प्रशासकीय अडचणी आल्या. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नगरसेवकांची अनेक कामे रखडली आहेत नगरसेवकांनी कामांच्या याद्या देऊनदेखील अंदाजपत्रकातील आर्थिक मर्यादेमुळे कामे होऊ शकलेली नाहीत. आता उत्पन्न वाढवून येत्या दोन वर्षांत नगरसेवकांनी सुचविलेली नागरी कामे कशी करता येतील यावर भर देणार आहे.तज्ज्ञांचा सल्ला घेणारशहरातील अनेक लहान मोठे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असतील, ते पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात शहरात चांगले प्रयोग साकारण्यासाठी मान्यवरांचा सल्लादेखील घेतला जाईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर