शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठींवर भर

By admin | Updated: August 20, 2016 02:00 IST

जेलरोड : महापालिका प्रभाग ३५, ३६ पोटनिवडणुकीत शह-प्रतिशह

नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत उमेदवार व पक्षाकडून मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे. मात्र पक्ष व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने एकमेकांना शह-प्रतिशह देण्यासाठी ‘भाई’ची मदत घेतली जात आहे.जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा, मनसे व कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही प्रभागांत शिवसेना, भाजपा, मनसे आमने-सामने आहेत, तर प्रभाग ३५ मधून राष्ट्रवादी व प्रभाग ३६ मधून पिपल्स रिपाइं कॉँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. दोन्ही प्रभागांत चौरंगी लढत होत असून, उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर दिला आहे. मनसेचादेखील तसाच प्रचार चालला असला तरी सध्या नाशिकरोडमध्ये एकमेव राहिलेले नगरसेवक व काही पदाधिकारी प्रचारात दिसत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाची आघाडी असली तरी ती दोन्ही प्रभागांत प्रचारामध्ये नावापुरती दिसत आहे. दोन्ही प्रभागांत त्या-त्या पक्षाचे व इतर मित्रपक्षांचे हातावर मोजण्याइतकेच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात दिसत आहे. चारही पक्षांकडे काही जणांची नावाला उपस्थिती असून, आगामी राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून हातचे राखून असल्यासारखा सहभाग दिसत आहे. प्रतिस्पर्धी पक्ष, पदाधिकारी यांच्याशी असलेल्या संबंधामुळे काहीजणांना स्वपक्षाकडून ‘ठराविक’ कामात सहभागी करून घेतले जात असल्याचे चित्र दिसत आहे. पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह जाणवत नसला तरी उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्या गल्लोगल्ली एकामागून एक फिरत आहे. अद्यापपर्यंत कुठलेही चित्र स्पष्ट नसले तरी जातपात, नातेगोते यांची प्रचारात मदत घेतली जाऊ लागली आहे. आघाडी व मनसेने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचार चालविला आहे. मात्र शिवसेना, भाजपाने शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रसद घेतल्याचे दिसत आहे. शिवसेना, भाजपामधील दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी व जिव्हारी लागणाऱ्या वागण्यामुळे दोन्ही पक्षांची सध्या एकमेकांतच लागल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)