शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समाजाशी भावनिक नात्याची गरज : गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:04 IST

नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.

नाशिक : नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील भारतीय शिक्षण मंडळाच्या दोनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी (दि.१७) सर्वसाधारण सभेने समारोप झाला. तत्पूर्वी संघटनेच्या विस्तारक आणि प्रांत प्रतिनिधींसाठी आयोजित बौद्धिक सत्रात ते बोलत होते. डॉ. वामन गोगटे म्हणाले, भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजाशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे तसेच सातत्याने अभ्यास आणि चिंतनाच्या माध्यमातून वैचारिकता निर्माण करण्याचे आवाहनही महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. त्यांनी संघटनेच्या विविध उपक्र मांची माहिती करून देताना शिक्षणात आवश्यक असलेल्या बदलांविषयी तज्ज्ञांचे विचारही जाणून घेतले. समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी महेश दाबक, डॉ. अस्मिता वैद्य यांच्यासह अधिवेशनास राज्यातून पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते. पंकज निफाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विजय अवस्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले.  मंडळाच्या वार्षिक सभेअंतर्गत रविवारी (दि.१७) सकाळी ९.३० वाजता आगामी नियोजनाबद्दलचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. त्यात दुपारी १२ ते १ या कालावधीत शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठाचे कुलगुरू व मान्यवरांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभ दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.संघटना बांधणीविषयक मार्गदर्शनअधिवेशनाच्या समारोप सत्रात मुकूल कानिटकर यांनी संघटना बांधणीविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कानिटकर म्हणाले की, संघटनेची बांधणी करताना कार्यकर्त्यांनी समाजाच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे, तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Nashikनाशिक