शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उदयोन्मुख : सिन्नर विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन अपूर्व उत्साहात

By admin | Updated: July 26, 2014 00:49 IST

‘लोकमत’वर स्नेहशुभेच्छांचा वर्षाव

सिन्नर : सनईच्या मंगल सुरांनी मंतरलेल्या वातावरणात अन् सुहृदयांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा अकरावा वर्धापनदिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित सिन्नरकरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त पंचवटी हॉटेलच्या मंत्रालय सभागृहात आयोजित ‘पानसुपारी’ समारंभास शेकडो सिन्नरकर सहर्ष उपस्थित राहिले. ‘लोकमत’वरील आपला स्नेह प्रकट करीत शब्दसुमनांनी अलंकृत झालेल्या भावनांचा वर्षाव करताना ‘लोकमत’शी असलेले स्नेहबंध अधिक गहिरे करण्याचे अभिवचनही सिन्नरकरांनी दिले.वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘उदयोन्मुख’ या विशेषांकाचे यावेळी सर्वांनी मन:पूर्वक कौतुक केले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक हेमंत कुलकर्णी, सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उदयोन्मुखांचा सत्कार करण्यात आला.या समारंभास केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विजया नाईक, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, सीमा माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती राजेश नवाळे, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे, पंचायत समितीच्या उपसभापती विजया जाधव, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, सुदामशेठ सांगळे, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, लायन्स क्लबचे अध्यक्ष हेमंत वाजे, बाजार समितीचे सभापती कचरू डावखर, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, संचालक हेमंत नाईक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, मनसेचे तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, नायब तहसीलदार कैलास चावडे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, प्रकाश कदम, विजय जाधव, विवेक चांडक, प्राचार्य संपतराव काळे, ह.भ.प. पांडुरंगगिरी महाराज, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, राजेश गडाख, डॉ. व्ही.एम. अत्रे, डॉ. विजय लोहारकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, बँकिंग, शिक्षण आदि क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपल्या सदिच्छा दिल्या. ‘लोकमत’चे संपादक हेमंत कुलकर्णी, सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी विभागीय कार्यालयात सौ.अनिता व सुनील थोरात यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. लोकमत विभागीय कार्यालयाचे शैलेश कर्पे, सुनील थोरात, कृष्णा वावधाने यांच्यासह लोकमत परिवाराने आभार मानले.