आॅक्सिजन पुरवठादारांची आज बोलावली तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:59 AM2020-09-07T00:59:21+5:302020-09-07T00:59:55+5:30

नाशिक : शहरात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच लिक्विड आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे, मात्र त्या प्रमाणात मुंबई-पुण्याहून अपेक्षित लिक्विड आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे व शहरातील सर्व आॅक्सिजन पुरवठादारांची तातडीची बैठक सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आली आहे.

An emergency meeting of oxygen suppliers was called today | आॅक्सिजन पुरवठादारांची आज बोलावली तातडीची बैठक

आॅक्सिजन पुरवठादारांची आज बोलावली तातडीची बैठक

Next
ठळक मुद्देप्रशासनाकडून दखल : औद्योगिक पुरवठ्यात कपात व्हावी


नाशिक : शहरात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच लिक्विड आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे, मात्र त्या प्रमाणात मुंबई-पुण्याहून अपेक्षित लिक्विड आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे व शहरातील सर्व आॅक्सिजन पुरवठादारांची तातडीची बैठक सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भामरे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. शहरातील काही उद्योगांना औद्योगिक कारणासाठी सुमारे सात ते आठ टन आॅक्सिजन दररोज पुरवले जाते. त्यात कपात करून काही प्रमाणात ते शहरातील रु ग्णांसाठी वापरण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजनची गरज आहे, मात्र मुंबई, पुणे, मुरबाड अशा विविध ठिकाणांहून येणारे आॅक्सिजन उत्पादकांकडून अपेक्षित लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी स्थानिक पुरवठादारांनी हतबलता व्यक्त केली असली तरी प्रशासन मात्र त्यांच्यावर दबाव टाकत आहे. दरम्यान, लोकमतने वृत्त दिल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भामरे यांनी सोमवारी (दि ७) दु. ३ वा. पुरवठादार यांची बैठक उद्योग भवन येथे आयोजित केली आहे. आॅक्सिजनची मागणी वाढलीशहरात कोरोनाचे संकट येण्यापूर्वी लागणाऱ्या आॅक्सिजनचा आता सुमारे आठ ते दहा पटीने वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण बाधितांची संख्येपैकी दोन टक्के रुग्णांनाच आॅक्सिजनची गरज असल्याचे सांगितले जात असले तरी त्या प्रमाणातही शहरामध्ये पुरवठा होत नसल्याने विलंब होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई-पुण्याच्या उत्पादकां-कडून अपेक्षित पुरवठा होत नाही. कारण संपूर्ण राज्यातच आॅक्सिजनची मागणी वाढली आहे.प्राणवायू पुरविणे बंधनकारक
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाºया वैद्यकीय प्राणवायूलादेखील मागणी वाढत आहे. वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: An emergency meeting of oxygen suppliers was called today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.