शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

टायर्सचा अपहार; कंटनेर चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:01 IST

चेन्नई (वडदरम) येथून अपोलो कंपनीचे टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्यास निघालेल्या मात्र दिंडोरी येथे टायर्स न पोहचविता १४९ टायर्सचा अपहार करून पळून गेलेल्या कंटनेरचालकास सिन्नर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून शिताफीने अटक करत त्याच्याकडून १३ लाख ३१ हजार ३६५ रुपये किमतीचे १४१ टायर्स हस्तगत केले आहे.

ठळक मुद्देसिन्नर पोलिसांची कामगिरी : १३ लाख ३१ हजारांचे १४१ टायर्स हस्तगत

सिन्नर : चेन्नई (वडदरम) येथून अपोलो कंपनीचे टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्यास निघालेल्या मात्र दिंडोरी येथे टायर्स न पोहचविता १४९ टायर्सचा अपहार करून पळून गेलेल्या कंटनेरचालकास सिन्नर पोलिसांच्या पथकाने ठाणे येथून शिताफीने अटक करत त्याच्याकडून १३ लाख ३१ हजार ३६५ रुपये किमतीचे १४१ टायर्स हस्तगत केले आहे.संदीप दगडुबा मुंढे, रा. वागदरवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड असे अटक केलेल्या कंटनेरचालकाचे नाव आहे. सातपूर-अबंड लिंकरोड, चुंचाळे फाटा अंबड येथील ओ. के. लॉजिस्टिक प्रा. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक भरत हरचंद मराठे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीतील चालक संदीप मुंढे याने अपोलो कंपनीच्या टायर्सचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कंटेनरचालक संदीप दगडुबा मुंढे यास कंटेनर (क्र. एनएल ०१ एबी ५९४०) मध्ये चेन्नई (वडदरम) येथून टायर भरून दिंडोरी येथे पोहोचविण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र चालक मुंढे याने दि .८ जुलै रोजी कंटेनरला लावलेले जीपीएस बंद केले. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालकाने चालक मुंढे यांच्याशी वारंवार संपर्क करूनदेखील त्याचा मोबाइल बंद असल्याने त्याच्याबाबत व टायरांनी भरलेल्या ठÑक कंटेनरबाबत कसलाही पत्ता लागत नव्हता. रविवारी (दि.१२) सदरचा कंटेनर हा सिन्नर पोलीस ठाणेच्या हदीत साईनाथ ढाबा येथे बेवारस स्थितीत आढळून आला. तसेच कंटेनरच्या मागील दरवाजास लावलेले सील तुटलेले असल्याचे दिसून आल्याने त्यातील टायरची तपासणी केली असता, एकूण १३ लाख ४६ हजार २६२ रुपये किमतीचे अपोलो कंपनीचे १४९ लहान मोठे टायर चोरीस गेलेले आढळून आले. चौकशीअंती चालक मुंढे याचेविरुद्ध टायरांचा अपहार केल्याप्रकरणी (दि.१७) रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाकामी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे यांच्या पथकावर जबाबदारी सोपवली.पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले. मात्र तो गावात व परिसरात मिळून आला नाही. आरोपी सद्य:स्थितीत राहत असलेल्या पत्त्याबाबत गोपनियरीत्या तपास केला असता सदर चालक हा जनतानगर झोपडपट्टी, काशिमिरा, जि. ठाणे येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस पथकास मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने ठाणे येथे जाऊन येथून ताब्यात घेतले.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस