शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

ंरमजानमध्ये शिक्षकांचे वेतन रखडल्याने नाराजी

By admin | Updated: June 12, 2017 00:28 IST

संतप्त प्रतिक्रीया : शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत रोकडच उपलब्ध नसल्याने चार महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे पैशांअभावी शिक्षकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. म्हणून शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅँकेमार्फत करावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही देण्यात आले आहे.याबाबत जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांकडून वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन, उपोषण सुरू आहेत. तशा आशयाचे निवेदनही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात येत आहेत. मात्र अद्यापपावेतो शासनाकडून शिक्षकांची आर्त मागणी असलेल्या वेतन अदा करणेबाबत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. यापूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते उघडून वेतनाची समस्या निकाली काढण्यात आली आहे, असे असताना पुन्हा शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसोबत सावत्र वागणूक दिली जात आहे. म्हणून शासनाने सर्वांना समान न्याय देत जिल्ह्यातील शिक्षकांना राष्ट्रीयकृत बॅँकेमार्फत वेतन अदा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद उपस्थित होते.गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा बॅँकेत वेतन अडकले आहे. जिल्ह्यासह मालेगाव शहरातील शिक्षकांना हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा सणासुदीच्या दिवसातही शिक्षकांना दयनीय परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.