शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

सांसद ग्राम योजनेच्या संथगतीवर नाराजी

By admin | Updated: December 5, 2015 23:35 IST

आढावा बैठक : सुचवलेली कामे कागदावरच

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांसद ग्राम आदर्श योजनेंतर्गत करावयाच्या कामांची संथगती पाहता जिल्ह्यातील दोन्हीही खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर अखेरपर्यंत कामांना मंजुरी देण्याचे बजावूनही संबंधित यंत्रणा त्यात वेळकाढूपणा करीत असल्याने आजवर एकही काम सुरू होऊ शकले नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. सांसद ग्राम आदर्श योजनेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड, तर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ही दोन गावे आदर्श ग्राम योजनेसाठी सुचविले असून, या योजनेतील तरतुदीप्रमाणे गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्रमाची कामेही निश्चित झालेली आहेत. या कामांसाठी शासनाकडून स्वतंत्र निधी नसून, शासनाच्याच विविध योजनांमधून सदरची कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे त्या त्या खात्याने या कामांचे अंदाजपत्रक, प्रस्ताव तयार करून त्यांना प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत सर्वच यंत्रणांना देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असली तरी प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या लालफीती कारभाराचा या योजनेलाही फटका बसला आहे. (प्रतिनिधी)