शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलन, मानवाधिकार संस्थांची नोंदणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:17 IST

नाशिक : मानव हक्क अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या नावांचा वापर करून समाज व शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे अशा नावांचा वापर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी बंदी घातली असून, अशा संस्थांकडून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्तांचे आदेश आता स्वयंघोषित संस्थांना बसणार चाप

नाशिक : मानव हक्क अधिकार, मानवाधिकार, भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार निर्मूलन यांसारख्या नावांचा वापर करून समाज व शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे अशा नावांचा वापर करण्यास धर्मादाय आयुक्तांनी बंदी घातली असून, अशा संस्थांकडून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या संदर्भात राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पत्रक काढले असून, त्यात राज्यात अनेक संस्था या भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अथवा भ्रष्टाचारमुक्त भारत या व इतर तत्सम नावाने नोंदविलेल्या आहेत. वास्तविकत: भ्रष्टाचार निर्मूलन हे शासनाचे काम असून, भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्याचे अधिकार शासकीय यंत्रणेस आहेत; परंतु काही संस्था भ्रष्टाचारविरोधी नाव त्यांच्या संस्थेस असल्यामुळे अधिकाºयांविरुद्ध किंवा व्यक्तींविरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत अथवा संस्थेस आहेत, असे समजून कार्यवाही करतात.तक्रारींवर कारवाईचा अधिकार यंत्रणांनामहाराष्टÑ सार्वजनिक विश्वस्त कायद्यान्वये हे उद्देश सामाजिक, धार्मिक अथवा शैक्षणिक उद्देश होऊ शकत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वास्तविकत: भ्रष्टाचार निर्मूलन अथवा मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार शासकीय यंत्रणेस आहेत.अशा नोंदणीकृत असलेल्या संस्थांच्या विश्वस्तांना नोटीस काढून त्यांच्या संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार निर्मूलन अथवा भ्रष्टाचार आणि मानवाधिकार हे शब्द वगळण्यास सांगावेत, जर विश्वस्तांनी नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. भ्रष्टाचार निर्मूलन किंवा मानवाधिकारांचे रक्षण करणे हे सरकारचे काम आहे. याबाबतच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारी यंत्रणांना आहे.

टॅग्स :Governmentसरकार