शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:17 IST

राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत.

ठळक मुद्देविभागीय परीक्षा मंडळावर धडकणार मोर्चा : शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन

येवला : राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत.या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विभागीय परीक्षा मंडळांबाहेर धरणे आंदोलन केली जाणार आहेत. यावेळी प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा कामकाज व पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे निवेदनही देण्यात येणार आहे. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे विभागाचे सचिव अनिल परदेशी, कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर यांनी दिली. तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून मंडळ अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवदनही देण्यात आले.१३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील १६३८ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित करण्यात आली. याशिवाय यापूर्वी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित करण्यात आली होती. १३ सप्टेंबर २०१९ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र घोषित विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना १ एपिल २०१९ पासून सरसकट २० टक्के अनुदान दिले जाईल व त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनात केली जाईल, असा उल्लेख होता. परंतु हिवाळी अधिवेशनात अनुदानाची तरतूदन झाल्याने शिक्षकांचा भ्रमनिरास झाल्याची भावना प्रा. दीपक कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्तकेली.यासंदर्भात नाशिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व शिक्षण अधिकाºयांना विभागाचे कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष नीलेश गांगुर्डे, महिला प्रतिनिधी वर्षा कुलथे, विशाल आव्हाड आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.नैसर्गिक टप्पावाढ अनुदानाची तरतूद हवीशासनाकडून गेल्या २० वर्षांपासून विनानुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांना सावत्र वागणूक दिली असल्याची खंत शिक्षकांना आहे. त्यामुळे १०० टक्के निकालाची अट रद्द करावी व शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के अनुदान वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी व नैसर्गिक टप्पावाढ अनुदानाची तरतूद करून तसा शासन आदेश जारी करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप