शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकरा दिवसांनंतर कांदा लिलाव

By admin | Updated: June 13, 2017 01:22 IST

अकरा दिवसांनंतर कांदा लिलाव

लासलगाव बाजार समिती : शेतकरी संपामुळे आवकेवर परिणाम लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : गेल्या अकरा दिवसांपासून बाजार समितीतील कांदा आवक बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येथील मुख्य बाजार आवारात कांद्याची आवक पाहायला मिळाली. यामुळे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपाच्या काळात आर्थिक झळ सोसावी लागली. जिल्ह्यातील सर्व भागातील शेतकरी संपात सामील झाल्याने कांद्याची संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली होती. ३१ मे रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. ३१ मेच्या तुलनेने सोमवारी उन्हाळ कांद्याला १२० रु पये प्रतिक्विंटल जास्तने भाव मिळाला आहे.शेतकरी संपामुळे ठप्प असलेल्या बाजार समिती आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी २५०, सरासरी ५७० तर जास्तीत जास्त ६८७ रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव बाजारपेठेत उत्साह दिसून आला. १५ हजार क्विंटल कांद्यांची आवक शेतकरी संपामुळे शेतमाल न आल्याने १ जूनपासून बंद असलेले शेतमालाचे लिलाव सोमवारी पूर्ववत सुरू झाले. त्यामुळे बाजार समिती आवार गजबजल्याचे दिसून आले. सोमवारी लासलगाव बाजार समितीवर उन्हाळ कांद्यांची १५ हजार ८८५ क्विंटल एवढी आवक झाली.