शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हाथी-घोडा पालखी,  जय कन्हैया लाल की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:55 IST

नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या जयघोषात मुक्तिधामसह शहरातील विविध मंदिरांत व घराघरांमध्ये रविवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या जयघोषात मुक्तिधामसह शहरातील विविध मंदिरांत व घराघरांमध्ये रविवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्यांची चाललेली धडपड. शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये सोमवारी (दि.३) उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला.  विविध वयोगटांतील दहीहंडीप्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंचवटी, सिडको, गोदाघाट, घनकरगल्ली, माहेश्वरी वसतिगृह येथील मंडळांनी आपापल्या भागात लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले होते. शहर व परिसरात दहीहंडीचा उपक्र म प्रामुख्याने काही शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेत नागरिकांनी उत्सवाचा आनंद लुटला. दहीहंडी फोडण्यात यशस्वी झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, काही शाळांना कालाष्टमीची सुटी देण्यात आली होती, तर काही शाळा नियमित भरल्या व त्या शाळांमध्ये दहीहंडीची जय्यत तयारी दिसून आली. शाळेतील सभागृहात वा मोकळ्या मैदानात दहीहंडीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा व गोपाळासारख्या गीतांची धूनही सुरू केली गेली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. शहरात काही मंडळांनी या उपक्र माचे आयोजन केले. दरम्यान, महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बाळगोपाळांसाठी दहीहंडी कार्यक्र माचे आयोजन महिंद्रा जीप हाउस, गंगापूररोड येथे मोठ्या उत्साहात झाला. या चिमुकल्या बाळगोपाळांना सर्वसामान्या  ंप्रमाणे सकारात्मक दृष्टीने आयुष्य जगता यावे व आयुष्यातील छोट्या-मोठ्या क्षणांचा आनंद भरभरून घेता यावा यासाठी या सदर दहीहंडी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्र माप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्राचे कमलाकर घोंगडे, सुशील नांबियार, नामदेव येलमामे आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बाळगोपाळांनी नृत्य, खेळाच्या माध्यमातून मनसोक्त आनंद लुटला.

टॅग्स :Dahi Handiदही हंडीNashikनाशिक