शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रशरच्या खाणपट्ट्यांची इलेक्ट्रॉनिक मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:18 IST

नाशिक जिल्ह्यात यंदा गौणखनिजापोटी २४ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधातील कारवाई मंदावल्याने कारवाईपोटी मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी धावाधाव : पंधरा वर्षाचे होणार मोजमापसारूळ व राजुर बहुला येथे जवळपास ३० खाणपट्टे

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने राज्यातील वाळू लिलावास स्थगिती दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यात गौणखनिज वसुलीपोटी मिळणाºया महसुलात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता गौणखनिज विभागाने जिल्ह्यातील खडी क्रशरसाठी दगडाचा पुरवठा करणा-या खाणपट्ट्यांची ‘इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन’ प्रणालीच्या माध्यमातून मोजमाप घेण्यात येणार असून, साधारणत: पंधरा वर्षात खाणमालकांनी किती उत्खनन केले याचा अंदाज बांधून त्या आधारे स्वामीत्वधन आकारणी करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात यंदा गौणखनिजापोटी २४ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधातील कारवाई मंदावल्याने कारवाईपोटी मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे. त्याची भर काढण्यासाठी गौणखनिज विभागाने वाळूचे लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडली परंतु अवघ्या चार ठिय्यांचे लिलाव होऊ शकले आहेत. अन्य २४ ठिय्यांच्या लिलावासाठी प्रशासनाने दोन वेळा फेर लिलाव जाहीर करूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. अशा परिस्थितीत गौणखनिज विभाग आर्थिक अडचणीत सापडला असता, त्यांनी पुन्हा लिलावाची तयारी सुरू करताच, न्यायालयाने वाळू ठिय्यांच्या लिलावाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठायचे कसे असा प्रश्न पडलेल्या गौणखनिज विभागाने आता जिल्ह्यातील खाण पट्ट्यांची ‘इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन’ प्रणालीचा वापर करून मोजणी करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरूवात नाशिक तालुक्यातील सारूळ व राजुर बहुला येथील खाणपट्ट्यापासून केली जाणार आहे. गेल्या पंधरा वर्षात या खाणींमधून किती उत्खनन करण्यात आले व त्यापोटी खाण मालकांनी शासनाकडे किती स्वामीत्वधन (रॉयल्टी) भरली याचा ताळामेळ त्याआधारे घेतला जाणार असून, खाणीतून अतिरीक्त उपसा झाला असेल तर पाच पट दंडाची आकारणी करून त्याची वसुली केली जाणार आहे. सारूळ व राजुर बहुला येथे जवळपास ३० खाणपट्टे असून, गेल्या अनेक वर्षापासून ते अविरत सुरू आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी डोंगर पोखरण्याचे काम केले जाते व त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. त्याविरूद्ध वेळोवेळी कारवाईही करण्यात आली परंतु खाणपट्टे मालक महसुल प्रशासनालाही जुमानत नाहीत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक