शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा वीजपुरवठा, वीजबिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 16:48 IST

महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेचे सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होत असून सातत्याने प्रयत्न करूनही ही हानी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपासच आहे. परिणामी महावितरणकडून या परिसरात वीजपुरवठा व वीज बिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी नियुक्तीसाठी कारवाई सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरण : मालेगावात सर्वाधिक वीजचोरी आणि वसुली कमी२० तारखेपर्यंत महावितरणच्या मुख्य कार्यालयाने प्रस्ताव मागविले

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेचे सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होत असून सातत्याने प्रयत्न करूनही ही हानी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपासच आहे. परिणामी महावितरणकडून या परिसरात वीजपुरवठा व वीज बिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी नियुक्तीसाठी कारवाई सुरू झाली आहे. याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.मालेगाव शहरातील तीन उपविभाग व ग्रामीण उपविभागातील काही भाग याठिकाणी फ्रॅन्चायसी नियुक्ती केली जाणार आहे. ही फ्रॅन्चायसी मालेगावातील वीजपुरवठा आणि वीज बिल वसुलीचे काम करणार आहे. यासाठी येत्या २० तारखेपर्यंत महावितरणच्या मुख्य कार्यालयाने प्रस्ताव मागविले आहेत.मालेगाव विभागात विजेचे वितरण व वाणिज्यिक हानी सर्वाधिक असल्याने याठिकाणी फ्रॅन्चायसी नियुक्तीची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. एप्रिल २०१६ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत मालेगाव विभागात वितरण हानी ३९.४९ टक्के व वाणिज्यिक हानी ५०.५९ टक्के होती. तर त्यानंतर एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मालेगाव विभागात वितरण हानी ४१.२६ टक्के व वाणिज्यिक हानी ४९.७२ टक्क्यांवर आली. यावरून वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आणि वितरण हानी वाढल्याचे दिसते.मालेगाव विभागात घरगुती, वाणिज्यिक व व्यावसायिक या लघुदाब ग्राहकांची संख्या २ लाख ३ हजार २११ तर औद्योगिक उच्चदाब ग्राहकांची संख्या ७५ आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या ग्राहकांनी वापरलेल्या ५५.६७ दशलक्ष युनिट विजेपोटी २५ कोटी २० लाख रु पयांची बिले देण्यात आली. पूर्वीच्या थकबाकीसह २६ कोटी १५ लाख रु पयांचा भरणा ग्राहकांनी केला. तर ३०७ कोटी ६४ लाख रुपयांची वीज बिले अजूनही थकीत आहेत. डिसेंबर २०१७ अखेर ५२ हजार ४९९ घरगुती, वाणिज्यिक व व्यावसायिक ग्राहकांकडे १८ कोटी २५ लाख रु पयांची चालू वीज बिले थकीत होती.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण