चांदवड/दरेगाव : तालुक्यातील कुंदलगाव येथील तरुणी शेतातील विहिरीजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून ठार झाली. येथील राजेंद्र नामदेव गिडगे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली. गायत्री ऊर्फ अंजना ज्ञानेश्वर कडनोर (१५) ही सोमवारी (दि.२४) विजेचा धक्का लागून जखमी झाली. मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला मृत घोषित केले.
विजेच्या धक्का लागून तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:22 IST