शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:40 IST

नांदगाव : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडून ४०,००० रु.ची लाच स्वीकारताना त्यांचेच वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र (४६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी १२.३० वाजेदरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देनांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी ही घटना घडली. नांदगाव ग्रामीणचे मदतनीस सुनील गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला

नांदगाव : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडून ४०,००० रु.ची लाच स्वीकारताना त्यांचेच वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र (४६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी १२.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कारवाई केली. सहाय्यक अभियंता या महिला आहेत.जळगाव बु. येथील रोहित्र स्थलांतर प्रकरणी निलंबन करण्याची कारवाई करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे न पाठविण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी ५०,००० रु. च्या लाचेची मागणी लोकसेवक शैलेशकुमार रमेशचंद्र यांनी सहायक अभियंता महिलेकडे केली होती. अशी लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांनी केली होती. त्यापैकी ४०,००० रु. घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या कार्यक्षेत्रातील जळगाव बु. येथील विद्युत मंडळाच्या रोहित्राची जागा बदलविण्यासाठी जळगाव बु.च्या काही शेतकºयांनी विद्युत महामंडळाची पूर्वपरवानगी न घेता रोहित्र स्थलांतरित केल्याने या शेतकºयांविरोधात नांदगाव ग्रामीणचे मदतनीस सुनील गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सहाय्यक अभियंता यांचा निलंबन कसुरी अहवाल न पाठविण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी लाचेची मागणी केली होती. पंच साक्षीदारा समवेत शैलेशकुमार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक पवन देसले व महेश भोरतेकर, नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवी, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, संदीप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, सुधीर सोनवणे, संदीप कदम आदींनी कारवाईत भाग घेतला.