शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु जयदर परिसरात २२ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:49 IST

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजीसध्या रब्बीचा हंगाम सुरु

कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु असून, जयदर वीज उपकेंद्रात्ांर्गत असलेल्या गावामध्ये सलग २२ तास वीज गायब राहत असल्याने आदिवासी बांधवांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दिवसातून फक्त २ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतपिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुनंद खोºयातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.५) जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुळेचे सरपंच चंद्रकांत गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जयदर व परिसरातील शेतकरी बांधवासह सरपंच चंद्रकांत गवळी, अर्जुन बागुल, पंडीत पवार, मन्साराम ठाकरे, देवराम महाजन, पंडीत गायकवाड, चंद्रकांत गवळी, रामा गायकवाड, लक्क्ष्मण गांगुर्डे, तुळशीराम चौधरी, उत्तम बागुल, सदू महाजन, काशिनाथ महाले यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यकार्यकारी अभियंता ॠषीकेश खैरनार यांची भेट घेऊन निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून कळवण तालुक्यात गहू, कांदा भाजीपाला ही पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून काही भागात लागवड सुरु आहे.कांदा पिकाला पाणी देण्यासाठी दिवसातून आठ तास विजेची गरज आहे. परंतु पुनंद खोºयातील जयदर वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावात वीजेचा लपंडाव सुरु आहे. २४ तासात फक्त दोनच तास अनिश्चित वेळेत वीज मिळत असल्याने शेती पिकाला पाणी दिले जात नाही. सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून ठिय्या आंदोलन काळात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. शिष्टमंडळात गणपत खांडवी, भावराव चौधरी, गोविंदा पवार, शिवाजी बागुल, लक्ष्मण पवार काशिनाथ भोये, उत्तम भोये, मन्साराम गायकवाड, सीताराम गायकवाड, परशराम भोये, गुलाब गांगुर्डे, राजाराम महाजन, रामदास महाजन, सखाराम ठाकरे, मणिराम बागुल, शिवराम खांडवी, भागवत जगताप, रामदास बागुल, सखाराम देहमुख, राजाराम गवळी, लक्ष्मण गवळी, धनराज गांगुर्डे, यशवंत भोये, मन्साराम बर्डे, शिवाजी चौधरी, महादू गायकवाड, दिनकर भोये आदी शेतकरी उपस्थित होते.