शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरणा केंद्र बंद असल्याने वीजबिले थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:12 IST

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देकळवण : महावितरणचे नुकसान; केंद्र सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.महावितरणच्या आॅनलाइन बिले भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला गेला तर बिले रीपिट आली. मीटर नोंद न करता बिले भरणे योग्य नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कळवण तालुका आदिवासीबहुल असून, आॅनलाइन बिले भरण्याबाबत जनता अनभिज्ञ आहे. महावितरण अ‍ॅप असो किंवा अन्य आॅनलाइन सुविधा गोरगरीब व आदिवासी जनतेला याबाबत अपेक्षित ज्ञान नाही व ते हाताळताही येत नाही. कळवण शहरातील धनलक्ष्मी पतसंस्था व कळवण मर्चंट बँकेत सर्व प्रकारचे वीजबिल अधिकृत भरणा केंद्र सुरू असताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरणा केंदे्र तात्पुरती बंद केली आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांकडून वीजबिलांचा भरणा झालेला नाही.आॅनलाइन भरणा करताना उपलब्ध साधनांअभावी ग्राहकांना बिले भरता आली नाहीत. दर महिन्याला मीटर रिडिंग घेत बिले येत असतात. ती बिले शेकडो ग्राहक या दोन्ही संस्थांमध्ये भरण्यासाठी जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून महावितरण कंपनीने ही दोन्ही केंद्रे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवली आहेत. यामुळे कळवण तालुक्यातील बिल भरणा मोठ्या प्रमाणात ठप्प असून, आॅनलाइन बिल भरणा करण्याबाबत ग्रामीण भागातील अज्ञानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मिटल्यानंतर एकदम तीन ते चार महिन्यांची बिले भरणार तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील ग्राहकांना पडला आहे.कळवण शहरातील महावितरण बिल भरणा केंदे्र पुन्हा सुरू करण्यात यावे व सुरक्षित अंतर व अन्य काळजी घेण्याच्या नियम व अटी यांची पूर्तता या संस्थांकडून करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतआहे.कोरोनाची साथ सुरू असताना बँक व पतसंस्थांची अन्य कामे सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत सुरू आहे. अन्य सेवा बंद नसताना बील भरणा केंद्रे बंद करून शासनानेग्रामीण व आदिवासी जनतेवर अन्यायाची भूमिका घेतली आहे, अशी भावना ग्राहकांची झाली आहे.कळवण तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक व्यापारी दुकाने खुली करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सुविधा समजून लवकरात लवकर वीजबिल भरणा केंद्रं सुरू करण्यात यावीत, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.महावितरण कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात संस्थेतील अधिकृत बिल भरणा केंद्र बंद केले आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी शासनाचे सर्व नियम-निकष पाळून पतसंस्थेत भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याची आमची तयारी आहे.- दीपक महाजन, कळवणबिल भरणा केंद्र बंद असल्यामुळे बिले थकत आहेत. मीटर रिडिंग न घेता बिले भरावीत कशी व कुठे, हा प्रश्न आहे. आदिवासी व ग्रामीण जनतेला मोबाइल अ‍ॅप व अन्य आॅनलाइन सेवेचा वापर करताना अडचणी येतात. भरणा केंद्र पुन्हा सुरू करावीत.- प्रभाकर गावित, ग्राहक, कळवण

टॅग्स :kalwan-acकळवणMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ