शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 24, 2016 01:44 IST

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. येवला तालुक्यातील दोघांचा, तर नांदगाव तालुक्यात एकाला जीव गमवावा लागला आहे.येवला तालुक्यातील ममदापूर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुडघे कुटुंबीयांच्या कांद्याच्या शेतात वीज पडून एकाच कुटुंबातील दोघे जण ठार झाले, तर एक जण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कांद्याच्या वाफ्यात साठलेले पाणी काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर विजेने झडप घातली. या घटनेने ममदापूर परिसरात शोककळा पसरली आहे.ममदापूर परिसरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर विजेच्या कडकडाटासह चालू असलेल्या मुसळधार पावसाने सारे बंधारे ओव्हरफ्लो झाले. ममदापूर गावापासून दीड किलोमीटर दक्षिणेला शेतात वस्ती करून राहणारे गुडघे कुटुंबीय आपल्या कांद्याच्या शेतात वाफ्यात साठलेले पाणी बाजूला काढण्यासाठी शेतात आले. दरम्यान, साडेपाचच्या सुमारास विजेचा लोळ त्यांच्या अंगावर पडला. यात गुडघे कुटुंबातील संतोष जगन्नाथ गुडघे (३२), वर्षा नवनाथ गुडघे हे दोघे दीर भावजय मृत झाले. मयत वर्षा गुडघे यांचे पती नवनाथ जगन्नाथ गुडघे यांना पायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. गुडघे यांच्या शेतात वीज पडल्यानंतर अर्धातास तिघेजण शेतातच पडून होते.बाजूलाच असलेल्या भाऊबंधांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या तिघांना खांद्यावर उचलून सुमारे दीड किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यापर्यंत आणले. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतोष आणि वर्षा यांचे निधन झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान नवनाथ जगन्नाथ गुडघे (३६) यांच्यावर राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर येवला शहरातील खासगी रु ग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यातील न्यू पांझण परिसरातील डोरलीपाडा वस्तीजवळ वीज पडून दत्तू साहेबराव चव्हाण (१३) याचा सायंकाळी मृत्यू झाला. सायंकाळी शाळेतून घरी परतत असताना ही घटना घडली. मृत दत्तू चव्हाण हा कर्मवीर भाऊराव पाटील साकोरा या विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. त्यांच्या मृत्यूने पांझण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.