शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 24, 2016 01:45 IST

नाशिक जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. येवला तालुक्यातील दोघांचा, तर नांदगाव तालुक्यात एकाला जीव गमवावा लागला आहे.येवला तालुक्यातील ममदापूर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुडघे कुटुंबीयांच्या कांद्याच्या शेतात वीज पडून एकाच कुटुंबातील दोघे जण ठार झाले, तर एक जण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कांद्याच्या वाफ्यात साठलेले पाणी काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर विजेने झडप घातली. या घटनेने ममदापूर परिसरात शोककळा पसरली आहे.ममदापूर परिसरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर विजेच्या कडकडाटासह चालू असलेल्या मुसळधार पावसाने सारे बंधारे ओव्हरफ्लो झाले. ममदापूर गावापासून दीड किलोमीटर दक्षिणेला शेतात वस्ती करून राहणारे गुडघे कुटुंबीय आपल्या कांद्याच्या शेतात वाफ्यात साठलेले पाणी बाजूला काढण्यासाठी शेतात आले. दरम्यान, साडेपाचच्या सुमारास विजेचा लोळ त्यांच्या अंगावर पडला. यात गुडघे कुटुंबातील संतोष जगन्नाथ गुडघे (३२), वर्षा नवनाथ गुडघे हे दोघे दीर भावजय मृत झाले. मयत वर्षा गुडघे यांचे पती नवनाथ जगन्नाथ गुडघे यांना पायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. गुडघे यांच्या शेतात वीज पडल्यानंतर अर्धातास तिघेजण शेतातच पडून होते.बाजूलाच असलेल्या भाऊबंधांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या तिघांना खांद्यावर उचलून सुमारे दीड किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यापर्यंत आणले. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतोष आणि वर्षा यांचे निधन झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान नवनाथ जगन्नाथ गुडघे (३६) यांच्यावर राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर येवला शहरातील खासगी रु ग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नांदगाव तालुक्यातील न्यू पांझण परिसरातील डोरलीपाडा वस्तीजवळ वीज पडून दत्तू साहेबराव चव्हाण (१३) याचा सायंकाळी मृत्यू झाला. सायंकाळी शाळेतून घरी परतत असताना ही घटना घडली. मृत दत्तू चव्हाण हा कर्मवीर भाऊराव पाटील साकोरा या विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. त्यांच्या मृत्यूने पांझण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.