शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबला शिलापूर ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: October 5, 2015 23:04 IST

ग्रामसभेचा निर्णय : मागण्या मान्य झाल्याशिवाय मंजुरी नाही

नाशिक : ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शिलापूर येथे होऊ घातलेले इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे कामकाज सुरू होऊ न देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थ सभेत घेण्यात आल्याने, या प्रकल्पाच्या मंजुरीवरून सुरू झालेल्या श्रेयवादात आता ग्रामस्थांनीही उडी मारली आहे. सरपंच मीनाताई कहांडळ यांच्या अध्यक्षतेखाली मारुती मंदिराच्या सभामंडपात ग्रामसभा घेण्यात आली. त्यात शिलापूर येथील गायरान जमीन गट नंबर २२० मध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. शिलापूर ग्रामपंचायतीच्या १५ आॅगस्ट २०१३ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतरच प्रकल्पास ग्रामसभेच्या ठरावाची मंजुरी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता व तशी कल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीशी अगर ग्रामस्थांशी कुठल्याही स्वरूपाची चर्चा न करता शासनाने बळजबरीने प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. शिलापूर ग्रामपंचायतीने इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबला ना हरकत दाखला अजूनही दिलेला नाही, त्यामुळे शासन दरबारी मंजूर झालेला प्रकल्प ग्रामस्थांना मान्य नाही, असेही सांगण्यात आले. ग्रामस्थांच्या मागण्या शासनाने लेखी स्वरूपात मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बैठकीस उपसरपंच विश्वनाथ कहांडळ, माजी सरपंच माधव कहांडळ, रमेश कहांडळ, शिवाजी कहांडळ, अरुण शिंदे, रामनाथ बुवा कहांडळ, विश्वनाथ कहांडळ आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (प्रतिनिधी)