शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:36 IST

मध्य प्रदेशचे विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांसह एक प्लॅटून, असा मोठा विशेष फौजफाट्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तालय हद्दीत मतदानप्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : मध्य प्रदेशचे विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांसह एक प्लॅटून, असा मोठा विशेष फौजफाट्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तालय हद्दीत मतदानप्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.निवडणूक प्रचार कालावधी शांततेत पार पडल्यानंतर मतदानाचा टप्पा शहरात सर्वत्र अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी चोख बंदोबस्त पोलीस आयुक्तालयाकडून तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी शनिवारी (दि.२७) पत्रकार परिषद पोलीस आयुक्तालयात घेतली. यावेळी त्यांनी महिनाभरात विविध पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवायांचा लेखाजोखा सादर केला. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात आचारसंहिता भंगाचा आयुक्तालय हद्दीत एक गुन्हा दाखल असून, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पाच वेळा आॅलआउट, तर ३३ वेळा कोम्बिंग आॅपरेशन शहरात राबविण्यात आले. त्याचप्रमाणे ४२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. तसेच बाहेरून आलेल्या १२ तडीपार गुंडांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. याबरोबरच मुंबई पोलीस कायदा, अमली पदार्थविरोधी कायदा, भारतीय हत्यार कायद्यान्वये सातत्याने कारवाई सुरू असून, आतापर्यंत १७ शस्त्र जप्त करण्यास पोलिसांना यश आल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांसह दारू विक्री, शांतता भंग करणाऱ्यांपैकी एकूण ६२ संशयितांविरुद्धकारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.४८ मतदान केंद्र संवेदनशीलपोलीस आयुक्तालय हद्दीतील चार मतदारसंघात एकूण एक हजार २१७ बूथ असून, त्यामध्ये १ हजार १०६ मुख्य, तर १११ अ‍ॅक्झिलरी बूथ आहेत. त्यापैकी ४८ बूथ संवेदनशील आहे. या बूथवर यापूर्वी निवडणूक काळात मतदानप्रक्रिया सुरू असताना कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. यामुळे अशा बूथवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदासुव्यवस्थेचा भंग करू पाहणाºयांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.असा आहे बंदोबस्तपोलीस आयुक्त : चार उपआयुक्त, नऊ सहायक आयुक्त, ४४ पोलीस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, २ हजार ५७५ पोलीस कॉन्स्टेबल, ६६६ गृहरक्षक दलाचे जवान, मध्य प्रदेश विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या व १ प्लॅटून, असा फौजफाटा असेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकPoliceपोलिस