शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात मतदान सुरळीत सुरू ; 4 ठिकाणी बिघडलेले मतदान यंत्र बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 09:16 IST

लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील 156 मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली.

घोटी (नाशिक) : लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील 156 मतदान केंद्रांवर सकाळीपासून मतदारांची मतदान करण्यासाठी रांग लागली. 4 ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने यंत्र बदलून मतदान सुरळीत करण्यात आले आहे. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यांनी चोख नियोजन करून मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवलेला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे लवकर मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मांडगे यांच्याकडून मतदान परिस्थितीवर सूक्ष्म लक्ष घातले जात आहे. केंद्रात मोबाईल नेण्याला बंदी असल्याने सेल्फी काढणाऱ्या मतदारांची पंचाईत झाली. इगतपुरी तालुक्यात 156 मतदान केंद्र असून आज सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी उन्हाची काहिली सुरू होत असल्याने लवकर मतदान करण्याचा अनेकांचा कल आहे. तालुक्यातील 4 मतदान केंद्रावर यंत्रात तांत्रीक बिघाड झाल्याने तातडीने यंत्र बदलून मतदान सुरू करण्यात आले. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना मतदान करता यावे म्हणून प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. टिटोली येथील मतदान केंद्र महिला अधिकारी आणि महिला पोलीस यामुळे चर्चेत आले. महिला मतदारांनी ह्या केंद्रावर उत्सुकतेने मतदान केले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह जागरूक नागरिकांनी जागृती सुरू केल्याचे दिसले.