शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

By दिनेश पाठक | Updated: May 17, 2024 22:08 IST

- दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा; १७ हजार निवडणूक कर्मचारी

नाशिक (दिनेश पाठक) : सोमवारी (दि.२०) होत असलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून मतदानासाठी जास्तीचा प्रवास नसावा, मतदारांची पायपीट थांबावी यासाठी प्रत्येक दोन किलोमीटरच्या आत किमान एक मतदान केंद्र असेल. आदिवासी बहुल असलेल्या दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असून संपर्कासाठी वॉकिटॉकीची सुविधा असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणुकीसाठी झालेल्या तयारीची माहिती शर्मा यांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, माहिती अधिकारी सप्रंता बिडकर उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर गरज पडल्यास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकास सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके, १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यासह सज्ज आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे सदस्य समाविष्ट केले आहेत.

- मतदान कर्मचारी : एकूण ११० टक्के प्रमाणात १७ हजार २८ कर्मचारी केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. ज्यामध्ये एकूण ५०८२ महिला कर्मचारी आहेत.- वाहतूक व्यवस्था : मतदान कर्मचारी व मतदान यंत्रे याकरिता ५३० बसेस यासह १२५२ वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.- वेबकास्टिंग : नाशिक लोकसभा मतदारसंघात ९५५ केंद्रावर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ९६१ केंद्रांवर बेवकास्टिंगची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे.- सूक्ष्म निरीक्षक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकरिता १३०, तर नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता २४० सूक्ष्म निरीक्षक () यांची नेमणूक करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक त्यांचा अहवाल मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील.- दिव्यांग मतदार : नाशिक जिल्ह्यात २,३१७ ठिकाणी व्हीलचेअरची सोय करण्यात येईल. ६२२ मतदारांना वाहतूक सुविधा पुरविण्याची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक 2024