शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालु्क्यातील ३३ गावांच्या सरपंच, उपसरपंचांची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:36 IST

विंचूर : निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवार (दि.२५) रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून, बहुतेक ग्रामपंचायत सदस्य ह्यनॉट रिचेबलह्ण असल्याने निवडणुकीच्या दिवशीच ते संपर्ककक्षेत येणार असल्याचे दिसते.

ठळक मुद्देविंचूर : ग्रामपंचायत सदस्य 'नॉट रिचेबल'

विंचूर : निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाचीनिवडणूक गुरुवार (दि.२५) रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून, बहुतेक ग्रामपंचायत सदस्य ह्यनॉट रिचेबलह्ण असल्याने निवडणुकीच्या दिवशीच ते संपर्ककक्षेत येणार असल्याचे दिसते.जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवड व नांदगाव या चार तालुक्यांमधील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका शिल्लक आहेत. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेता एकाच दिवशी निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याने २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवसांत तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडप्रक्रिया होणार आहे. सरपंच पदाच्या आरक्षणानंतर अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याने सरपंचपदाची समीकरणे बदलली आहेत.आरक्षण जाहीर झाल्यापासून विजयी झालेल्या संबंधित प्रवर्गामधील सदस्यांकडून संख्याबळ जुळविण्यासाठी ताकद लावली जात आहे. विंचूर येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद नामाप्र वर्गासाठी राखीव असल्याने संबंधित प्रवर्गातील जवळपास चार ते पाच सदस्य सरपंचपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. सरपंचपदासाठी इच्छुक सदस्यांनी यापूर्वीच सुत जुळविण्याचे काम सुरू केले होते.                                                   सरपंचपद निवडीच्या दिवशी दगाफटका नको म्हणून त्यांची योग्य ती देखभाल घेत काही सदस्य गायब मोडवर असल्याचे चित्र आहे. मागचा अनुभव पाहता सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळी ते वेळेवर उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. विंचूर ग्रामपंचायत सरपंचपद निवडणुकीसाठी सी. ए. पंडित यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.                                                      सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. माघारीची वेळ दीड ते दोन वाजेपर्यंत असून आवश्यकता असल्यास नियमाप्रमाणे दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया होणार आहे. एकूण सतरा सदस्यसंख्या असलेली विंचूर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली बघता सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक