शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या आत निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:09 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे नॉमिनेशनची प्रक्रिया रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाइन करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे सोमवारी रात्री १२ वाजेच्या आत निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाइन होऊ शकली. 

ठळक मुद्देदिलासा : मुदतवाढीमुळे कामकाजाला मिळाला वेळ 

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे नॉमिनेशनची प्रक्रिया रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाइन करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे सोमवारी रात्री १२ वाजेच्या आत निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाइन होऊ शकली. निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्याने रात्री उशिरापर्यंत तालुकापातळीवर ऑनलाइन अपलोडिंगची प्रक्रिया सुरू होती.     जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी यंदा उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत होती. मात्र पहिल्या चार  दिवसांत केवळ साडेचार हजार ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. पाचव्या दिवसापासून अर्ज दाखल करण्याचा वेग वाढल्याने ऑनलाइन यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करता आले नाहीत. याबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्यांनी निवडणुकीपासून इच्छुक वंचित राहू नयेत म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देऊन उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन घेण्याचे आदेश दिले.अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत सुरू असलेली प्रक्रिया आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे अर्ज दाखल करून घेण्याची वेळ संपत येत असल्याने यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला होता. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अपलोडिंग पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. राज्यात नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण, पुणे या सर्व ठिकाणी न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे ऑनलाइन नॉमिनेशनची प्रक्रिया सोमवारी रात्री २३.५५ पर्यंत सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे प्रशासकीय काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आयोगाच्या आदेशानुसार  अर्ज मागे घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया रात्री १२ वाजेच्या आत पूर्ण करण्यात आल्या.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक