शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
3
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
4
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
5
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
6
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
7
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
8
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
9
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
10
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
11
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
12
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
13
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
14
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
15
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
16
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
17
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
18
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
19
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
20
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

बीएलओंची निवडणूक अधिकाºयांशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:31 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सुरू झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाºया सर्वेक्षणात मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातली परिणामी प्रशिक्षणात काहीकाळ व्यत्यय आला.

ठळक मुद्दे मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारण ३० नोव्हेंबरपर्यंतच काम पूर्ण करण्याची सक्ती निवडणूक अधिकाºयांना धारेवर धरले.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सुरू झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाºया सर्वेक्षणात मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातली परिणामी प्रशिक्षणात काहीकाळ व्यत्यय आला. अखेर उपजिल्हानिवडणूक अधिकाºयांनी मध्यस्थी करीत बीएलओंची समजूत घातल्याने वादावर पडदा पडला.  मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी मतदार यादी घेऊन प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्याची खात्री करण्याबरोबरच नवीन मतदारांची नोंदणी, दुबार, मयत मतदारांचे नाव वगळणे, भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करणे आदी कामे सोपविण्यात आली आहे.  निवडणूक आयोगाने बीएलओची नेमणूक करताना शासकीय कर्मचाºयांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, बहुतांशी बीएलओ शिक्षकच आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सध्या शिक्षकांना सहामाही परीक्षेचे व निकालपत्र तयार करण्याचे काम दिलेले असल्याने त्यातच बीएलओंचे कामे सोपविण्यात आल्याने व ३० नोव्हेंबरपर्यंतच सदरचे काम पूर्ण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरातील बीएलओंचे प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी काही बीएलओंनी प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या निवडणूक अधिकाºयांना धारेवर धरले. सेवानिवृत्तीला काही कालावधी बाकी असताना या वयात कसे फिरायचे असा सवाल करीत, मतदार याद्यांमध्ये मतदारांचे पत्ते अर्धवट व चुकीचे असल्याने ते सापडत नाहीत, त्यामुळे मतदारांचे परिपूर्ण पत्ते असलेली मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मागण्या : थेट उपजिल्हाधिकाºयांकडे धाव दैनंदिन शाळेचे कामकाज सांभाळून उर्वरित वेळेत काम कसे करायचे, त्यापेक्षा आम्हाला शैक्षणिक कामातून मुक्त करावे, मतदार याद्या पुनरीक्षणाचे कामाची मुदत वाढवून द्यावी आदी मागण्या करण्यास सुरुवात केल्याने प्रशिक्षण कार्यशाळेत गोंधळ उडाला, त्यातच निवडणूक अधिकाºयानेदेखील दुरुत्तरे केल्याने संतापलेल्या बीएलओंनी कार्यशाळेतून काढता पाय घेत, थेट उपजिल्हानिवडणूक अधिकाºयांकडे धाव घेत तक्रार केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली, नंतर मात्र प्रशिक्षण कार्यशाळा सुरुळीत पार पडली.

टॅग्स :Electionनिवडणूक