शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निफाड, चांदवड तालुक्यातील निवडणूकही स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:47 IST

नाशिक: सरपंच पदाचे आरक्षण काढतांना नियम आणि निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक येत्या १६ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित सरपंच पदाची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसारच होणार आहे. दरम्यान आरक्षणाबाबतच्या हरकती वाढल्याने राबविण्यात आलेली प्रक्रिया चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देसरपंच आरक्षण हरकत: २१८ ग्रामपंचायतींची प्रक्रिया थांबली

नाशिक: सरपंच पदाचे आरक्षण काढतांना नियम आणि निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक येत्या १६ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित सरपंच पदाची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसारच होणार आहे. दरम्यान आरक्षणाबाबतच्या हरकती वाढल्याने राबविण्यात आलेली प्रक्रिया चर्चेत आली आहे.जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसाार येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथील सरपंच आरक्षणाला हरकत घेण्यात आल्यामुळे सिन्नर तालुक्यातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

आता निफाड आणि चांदवड तालुक्यातील सरपंच पदाची निवडणूकही अशाच कारणामुळे स्थगित करण्यात आलेली आहे. या तीनही तालुक्यांमधील एकूण २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक आता येत्या १६ तारखेनंतर घेतली जाण्याची शक्यता आहे. निफाड तालुक्यातील ६५, सिन्नर तालुक्यातील १०० तर चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना आता स्थगिती मिळाली आहे.देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातराणे या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोगाने रद्द केल्या. त्यामुळे ६२१ पैकी ६१९ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. दाखल झालेल्या याचिकांनुसार उच्च न्यायालयाने जिल्ह्यातील निफाड, सिन्नर व चांदवड या तीन तालुक्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंच निवडीला स्थगिती दिली आहे.

चांदवड तालुक्यातील मौजे वागदर्डी, सिन्नर तालुक्यातील रामपूर व दहीवडी महाजनपूर गावचे आरक्षण तर निफाड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत रिट याचिका दाखल झाल्याने या तीनही तालुक्यांमधील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, चांदवड आणि निफाड येथील तहसीलदारांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक