शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:33 IST

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे ८ हजार ७०० सभासद या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्दे२० जुलैला मतदान : अध्यक्षांसह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त, १९ संचालकांची होणार निवड

नाशिक : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे ८ हजार ७०० सभासद या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात मंगळवारी (दि.१८) निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी पत्रकार परिषद घेत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी निवडणूक मंडळातील सदस्य अ‍ॅड. अशोक कातकाडे व अ‍ॅड. संतोष दरगोडे उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. सानप म्हणाले, की संस्थेच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे. महत्त्वाच्या पदांमध्ये सहा विश्वस्त व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व सहचिटणीस या चार जागांचा समावेश आहे. कार्यकारी मंडळात एकूण १९ सदस्य असून, त्यात इगतपुरी ४, सिन्नर ३, निफाड व चांदवड ३, येवला व मालेगाव २, नांदगाव, बागलाण, कळवणला २, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात ३ जागा व महिलांसाठी दोन जागा राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी लवाद म्हणून अ‍ॅड. एस. जी. सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असा आहे कार्यक्रम२४ जून रोजी प्राथमिक मतदान यादी जाहीर होणार.च्२४ ते २७ जूनपर्यंत मतदार यादीवर हरकती नोंदविता येतील.च्२९ जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल.च्३० जून ते ३ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती.च्४ जुलै रोजी अर्जांची छाननी. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार.च्५ ते ८ जुलैपर्यंत माघार घेता येईल.च्९ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्ह वाटप होणार.च्२० जुलै रोजी संस्थेच्या मुख्यालयात मतदान होईल.च्२१ जुलै रोजी मतमोजणीराजकीय हालचालींना वेगसंस्थेची निवडणूक जाहीर होताच विरोधकांसह सत्ताधारी गटामध्येही निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पॅनलचे नेते कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार होणे निश्चित मानले जात असून, सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांनी परिवर्तन पॅनलची घोषणाही केली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरीनाथ थोरे, अ‍ॅड. पी. आर. गिते आदींनी या पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाºयांविरोधात लढत देण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक