सातपूर : आयमाच्या माजी अध्यक्षाच्या सल्लागार समितीची द्वैवार्षिक निवडणूक संपन्न झाली. यात समितीच्या अध्यक्षपदी एस. एस. आनंद यांची निवड करण्यात आली.़़ आयमाच्या माजी अध्यक्षाच्या समितीच्या (बीओपीपी) पाच जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत तेरा माजी अध्यक्षांनी एकमेकांना मतदान केले. यात सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पहिल्या पाच उमेदवारांची निवड केली जाते. त्यानुसार एस. एस. आनंद, ज्ञानेश्वर गोपाळे, विजय तलवार, एस. एस. बिर्दी, सुरेश माळी आदिंना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची समितीत निवड करण्यात आली. या निवडणुकीत योगेश कनानी, जे. एम. पवार, संदीप सोनार, विवेक पाटील, धनंजय बेळे, बी. इ. कोतवाल, जे. आर. वाघ आदिंसह माजी अध्यक्ष सहभागी झाले होते. मावळते अध्यक्ष बिपीन बटाविया यांनी निकाल घोषित केला. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सरचिटणीस निखिल पांचाल यांनी नवनिर्वाचित समिती आणि अध्यक्ष आनंद यांचे स्वागत केले. (वार्ताहर)
आयमा सल्लागार समिती निवडणूक
By admin | Updated: August 1, 2016 01:21 IST