शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपलेल्या जिल्हा बॅँकेची निवडणूक अखेर लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:18 IST

नाशिक : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने न घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांची मुदत मे महिन्यातच संपुष्टात आली असून, शासनाने आजवर दोनवेळा मुदतवाढ दिल्याने आता सप्टेंबरनंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरनंतर निवडणूक : शासनाने घेतली निधीची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने न घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांची मुदत मे महिन्यातच संपुष्टात आली असून, शासनाने आजवर दोनवेळा मुदतवाढ दिल्याने आता सप्टेंबरनंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे.दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून शासनाच्या कर्जमाफीच्या रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा बॅँकेला येत्या सप्टेंबरअखेर ९३५ कोटी रुपये मिळणार असून, शासनाने तशी हमी दिली आहे.नाशिक जिल्हा बॅँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपुष्टात येणार असल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची तयारी चालविली होती. त्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव मागण्यास सुरुवातही करण्यात आली होती. काही सोसायट्यांनी तसे ठरावही करून पाठविले. मात्र मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच शासनाने मे महिन्यात मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने जिल्हा बॅँकेला तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे.अध्यक्षपदासाठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हेजिल्हा बॅँकेला सप्टेंबरअखेर कर्जमाफीची रक्कम देण्याची तयारी शासनाने दर्शविली असून, त्यामुळे बॅँक पुन्हा उर्जितावस्थेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा बॅँकेवर सत्ताधारी महाविकास आघाडीचा अध्यक्ष असावा, असा मतप्रवाह पुढे आला आहे. त्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना हटवून सेनेचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र