शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:34 IST

निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे१९ डिसेंबर रोजी मतदान

निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील यांनी दिली आहे.या सर्व १३ संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून पात्र व प्राप्त नामनिर्देशन पत्र ज्या उमेदवारास मागे घ्यावयाचे आहे. त्यांना ८ डिसेंबरपर्यंत मुदत असून ९ डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक १९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येऊन मतदानाची मुदत संपल्यानंतर लगेचच अर्ध्या तासानंतर मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांची नावे व त्यासाठी निवडणूक प्राधिकरणाने नेमणूक केलेले निवडणूक निर्णय अधिकारी पुढीलप्रमाणे गोंदेगाव सहकारी सेवा संस्था मर्या. गोंदेगाव (रणजीत पाटील-सहा. निबंधक), रेणुका माता सेवा संस्था मर्या. निमगाव (जगदीश पाटील- सहकार अधिकारी), गुंजाळवाडी सहकारी सेवा संस्था मर्या. गुंजाळवाडी (बाळासाहेब थेटे-सहकार अधिकारी), चितेगाव सहकारी सेवा संस्था मर्या. चितेगाव (अशोक काकड-मुख्य लिपिक), बाणेश्वर सहकारी सेवा संस्था मर्या. कोठुरे (कैलास पिठे-सहाय्यक सहकार अधिकारी), बाणगंगा सहकारी सेवा संस्था बाणगंगानगर (रवींद्र गुंजाळ-लेखा परीक्षक), विवेकानंद सहकारी सेवा संस्था मर्या. चापडगाव (ज्योती घडोजे-लेखा परीक्षक), वर्हेदारणा सेवा संस्था मर्या. वर्हेदारणा (मुरलीधर भोये- लेखा परीक्षक ), समर्थ सेवा संस्था मर्या. शिवरे (सचिन खैरनार-सहकार अधिकारी), नारायणटेंभी सहकारी संस्था मर्या, नारायणटेंभी (सचिन काकड -वरिष्ठ लिपिक), शिवरे सहकारी सेवा संस्था मर्या. शिवरे ( कृष्णा वाळके-वरिष्ठ लिपिक), भैरवनाथ सहकारी सेवा संस्था मर्या. चाटोरी (सुनील आढाव-अप्पर लेखा परीक्षक), निफाड तालुका ग्रामोद्योग संघ (आर. एस. ढवळे-सहकार अधिकारी)

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक