शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई येथून आलेल्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:23 IST

देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.सदर महिला दि. १६ रोजी मुंबई येथून टेंभे (ता. सटाणा ) येथे आली होती. दुसऱ्या दिवशी (दि. १७) रोजी या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वासोळपाडा येथे असलेल्या आपल्या मुलाला फोन केला. मुलगा टेंभे येथे गाडी घेऊन आला. आपल्या आईला घेऊन तो मेशी (ता. देवळा) येथील एका खासगी दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन आला.यावेळी महिलेची गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला नाशिक येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दि. १८ रोजी तिचा मृत्यू झाला. या महिलेचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी (दि. २१) प्राप्त झाला असून, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉ. मांडगे यांनी दिली.देवळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, दक्षता म्हणून वासोळपाडा येथील या महिलेच्या भावाचे कुटुंबीय व मेशी येथील डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्य तसेच या महिलेच्या संपर्कात आलेले अशा एकूण नऊ व्यक्तींना देवळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कॉरण्टाइन करण्यात आले आहे. मेशी व वासोळपाडा येथे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मेशी गावातील ग्रामस्थांनी रविवारी (दि. २४) संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, बाहेरून येणाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक