शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:20 IST

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील दोनवाडे येथील रहिवासी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्या सुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापूर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते.

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील दोनवाडे येथील रहिवासी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्या सुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापूर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागलीे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दोनवाडे गावात जीवराम ठुबे हे आपल्या शेतातील घरात एकटेच राहत होते. रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास झोपडीवजा घरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार मारले आणि त्यांच्या मृतदेहाचा काही मांसल भाग खाऊन प्रेत लगतच्या नाल्याजवळ सोडून दिल्याचे सकाळी उघडकीस आले. सोमवारी सकाळी ८ वाजता ठुबे यांचा नातू सागर हा आजोबांना चहा घेऊन पडवीत आला असता घराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग दिसून आले. आजोबा घरात नसल्याचे बघून सागरने दोनवाडे गावातील घरी येऊन वडील दत्तू ठुबे यांना माहिती दिली. नागरिकांनी मळ्यात धाव घेतली. घरात सांडलेले रक्त बघून त्यांनी नाल्याकडे धाव घेतली. तेथे जीवराम यांचा मृतदेह त्यांना आढळून आला.पोलीसपाटील संपत वाघ यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वनविभागाला तत्काळ घटनेची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत जीवराम ठुबे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार मुलगे असा परिवार आहे.——इन्फो—तीन पिंजरे तैनात; ट्रॅप कॅमेरे बसविणारदोनवाडे गावच्या मळे परिसरात बिबट-मानव संघर्ष उभा राहिला आहे. या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तत्काळ शेताच्या बांधालगत तीन पिंजरे अभ्यासपूर्ण पद्धतीने तैनात केले आहे. दोनवाडे मळे परिसरात वनविभाग व इको-एको फाउण्डेशनचे वन्यजीवप्रेमींकडून सर्व पाहणी करून ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहे. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच बिबट हल्ल्यातील काही नमुनेदेखील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nashikनाशिक