शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवृत्ती उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:40 IST

लवकरच कार्यवाही : आयुक्तांचा नियमावलीकडे अंगुलीनिर्देश

ठळक मुद्देमुदतवाढीसाठी गळ लावून बसलेल्या सदस्यांचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यतासन २००४ मध्ये झालेल्या न्यायालयीन निवाड्याचे हवाले दिले जात असून तत्कालिन स्थायी समिती सभापतीकडून मार्गदर्शनही घेतले जात आहे

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांना पूर्ण एक वर्षाचा कार्यकाल मिळावा यासाठी आटापीटा सुरू असताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मात्र, नियमावलीकडे अंगुलीनिर्देश करत निवृत्तीची कार्यवाही २८ फेबु्रवारीच्या आतच होण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुदतवाढीसाठी गळ लावून बसलेल्या सदस्यांचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फेबु्रवारी २०१७ मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर, ३० मार्चला स्थायी समितीवर महासभेने राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती केली होती तर ७ एप्रिलला सभापतीपदाची निवड झालेली होती. महाराष्ट महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार स्थायी समितीच्या आठ सदस्यांना २८ फेबु्रवारीच्या आत चिठ्ठी पद्धतीने निवृत्त केले पाहिजे. परंतु, विद्यमान स्थायी समितीला संपूर्ण वर्षभराचा कालावधी मिळत नसल्याने समितीने मुदतवाढीसाठी आटापीटा चालविला आहे. त्यासाठी सन २००४ मध्ये झालेल्या न्यायालयीन निवाड्याचे हवाले दिले जात असून तत्कालिन स्थायी समिती सभापतीकडून मार्गदर्शनही घेतले जात आहे. त्यातच शिवसेनेचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी थेट विभागीय आयुक्तांना पत्र लिहून एक वर्षाचा कालावधी मिळण्याची मागणी केलेली आहे. या सा-या घटना-घडामोडींबाबत बोलताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, सन २०११ मध्ये महापालिकेच्या कायद्यात बदल व सुधारणा झालेली आहे. त्यामुळे नियमानुसार, २८ फेबु्रवारीच्या आत स्थायी समितीवरील आठ सदस्य निवृत्त केले जातील. त्यानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या स्पष्टीकरणामुळे, स्थायी समितीला मुदतवाढ मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्षशिवसेनेचे स्थायी समितीतील सदस्य प्रवीण तिदमे यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून विद्यमान स्थायी समितीला पूर्ण वर्षभराचा कालावधी मिळण्याची मागणी केलेली आहे. अद्याप विभागीय आयुक्तांकडून त्यावर निर्णय आलेला नाही. मात्र, नगरसचिव विभागाने स्थायी समितीला पत्र पाठवत आठ सदस्यांच्या निवृत्तीची कार्यवाही करण्यासाठी तारीख व वेळ कळविण्याची सूचना केलेली आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या भूमिकेकडेही सदस्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका