शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राहुड घाटात विचित्र अपघातात आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:42 IST

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन एक कंटेनर घाटाच्या खोल दरीत कोसळला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने तीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात झाला.

ठळक मुद्देतीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन एक कंटेनर घाटाच्या खोल दरीत कोसळला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने तीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात झाला.घटनास्थळी चांदवड पोलीस, सोमा कंपनीचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर पथक व कर्मचाऱ्यांनी मदत केली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. कंटेनरचे (क्र. डीडी ०३ एच ९३५०) सायंकाळी सात ते सव्वासात वाजेच्या सुमारास राहुड घाटात ब्रेकफेल झाले. त्याने प्रारंभी मालेगावकडे जाणाºया कारला (क्र. एमएच २० ईवाय ०६४३) धडक दिली. त्यानंतरे स्वीफ्ट कारला (क्र. एमएच ०२/६१४८) धडक देऊन पिकअपला (क्र. एमएच ४१ एजी१३३७) धडक दिली. याचवेळी मालेगावकडे जाणाºया मोटारसायकलला धडक दिली. मात्र दुचाकीचालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा ताबा सोडला नाही. दुचाकीचालक घटनास्थळावरून निघुन गेला. धडक देत देत कंटेनर खोल दरीत कोसळला. यात कंटेनरचालक ओमप्रकाश मौर्र्य (३५, रा. मिर्झापूर) तर क्लीनर लवकुश कुमार मौर्य (१७ रा. मिर्झापूर यू.पी.) हे दोघे गंभीर जखमी झाले. तर कारमधील सोनाली श्रीराम पाटील (४२), गायत्री स्वप्नील पाटील (२०), तृप्ती गौरव पाटील (३२), स्वप्नील श्रीराम पाटील (२६), गौरव राजेंद्र पाटील (२७, सर्व रा. चाळीसगाव) हे जखमी झाले. पिकअपचालक रोहिदास धोंडू नवगिरे (३४, रा.मालेगाव) जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वीफ्ट मधील सर्व प्रवासी मालेगाव येथे नेण्यात आल्याने त्यांची नावे समजु शकली नाही.घटनेचे वृत्त समजताच सोमा कंपनीचे ग्रस्तीपथक,चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप, चंद्रकांत निकम, बी.ए.सुर्यवंशी,देशमुख, मंगेश डोंगरे, जगताप, संसारे,वाळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले तर १०८रुग्णवाहीकेच्या सहाय्याने जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे शहरातील खाजगी व शासकीय डॉक्टरांनी जखमीवर औषधोपचार केले . चांदवड पोलीस स्टेशनला गौरव पाटील रा.चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरुहोते तर अधिक तपास पोलीस करीत आहेत.