शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:34 IST

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड ...

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई पाण्यासाठी महिलांची दूरवर भटकंती

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड वाळू उपशामुळे रख्ख वाळवंटात रूपांतरित होताना दिसत असून, सुपीक जमीन पाण्याअभावी नापेर होत आहे. या प्रचंड वाळू उपशाचा परिणाम म्हणजे शेतमालक आता शेतमजूर झालेले दिसत आहेत. मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार अवैध वाळू उपसा शहरातील पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. प्रशासन वाळूचोरी रोखण्यात अपयशी ठरल्याने पाणीटंचाईची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मोसम खोºयाची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असल्याने शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा वितरणासाठी आजही १९७२च्या कालबाह्य अशा जुन्या पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया बहुतांश विहिरी मोसम नदीपात्रालगत आहेत. परंतु महसूल व पोलीस प्रशासनाच्या मैत्रीमुळे रात्रीच्या वेळी येथीलनदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. विशेषत: सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया विहिरीजवळ वाळूचा उपसा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.मोसम नदीपात्रातून वाळू उपसण्याचा परिणामनामपूर शहर हे नवीन तालुका निर्मितीत वेटिंग लिस्टला अग्रक्र मातील गाव. येथे पाणीप्रश्नातील तीव्रतेत वाळू उपसा हे मुख्य कारण आहे. द्यानेकरांनी आंदोलन केले तेव्हापासून वाळू उपसून ट्रॅक्टरने वाहतूक करणे काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आता यासाठी गाढवांचा वापर सुरू आहे. अजूनही प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होऊन शेकडोंच्या संख्येने असलेल्या या गाढवांद्वारे या वाळूची वाहतूक केली जाते. भल्या पहाटेपासून सुरू होणारा हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. नदीपात्रात उघडे खडक व मोठाले खड्डे हे वाळू उपशाचे नदीपात्रातील पुरावे आहेत. गावातील बांधकामांसाठी वाळू लागते या कारणातून रात्री-अपरात्री ही वाळू बाहेरगावीही पाठविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे सर्वत्र खडकांचे साम्राज्य पाहायला मिळते. वाळूचोरट्यांनी मोसम नदी अक्षरश: बकाल करून टाकली आहे. साक्री रस्त्यालगत असलेल्या पुलाखालची वाळूदेखील या चोरांच्या नजरेतून सुटलेली नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये आमदार दीपिका चव्हाण यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा शहराला पाणीपुरवठा केला होता. त्या धर्तीवर यंदाही हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.