नाशिक : मागील रविवारी शहराने गोदेचा महापूर अनुभवला. मात्र या रविवारी (दि.११) दुतोंड्या मारुतीरायाच्या पायाखाली नदीच्या पाण्याची पातळी आली. गंगापूर धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सात हजारांवरून विसर्ग थेट एक हजारांपर्यंत खाली आला. यामुळे शांत वाहणारी गोदावरी या रविवारी नाशिककरांनी बघितली. गोदावरीची पूरपरिस्थिती ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.गेल्या रविवारी गोदावरीला महापूर आल्याने नाशिककरांना मोठा फटका बसला. या महापुरातून हळूहळू गोदाकाठ सावरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी गोदावरीच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले होते.शहरात १.६ मिमी पाऊसशहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान केवळ १.६ मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातही रविवारी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. गंगापूर, कश्यपी ४, गौतमी-१०, त्र्यंबक-१५ आणि अंबोली-१८ मिमी इतका पाऊस दिवसभरात पडला. धरण ८९.५६ टक्के भरले असून, विसर्ग १ हजार १३७ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
आठ दिवसांनंतर गोदेचा पूर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 02:00 IST
मागील रविवारी शहराने गोदेचा महापूर अनुभवला. मात्र या रविवारी (दि.११) दुतोंड्या मारुतीरायाच्या पायाखाली नदीच्या पाण्याची पातळी आली. गंगापूर धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सात हजारांवरून विसर्ग थेट एक हजारांपर्यंत खाली आला.
आठ दिवसांनंतर गोदेचा पूर ओसरला
ठळक मुद्देविसर्ग घटला : दुतोंड्या मारुतीच्या पायाखाली पाणी