शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:22 IST

नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तो कमीच आहे.गेल्या दोन दिवसांत जिल्ह्णात सर्व दूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  शेतकरी वर्गात आनंद ...

नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तो कमीच आहे.गेल्या दोन दिवसांत जिल्ह्णात सर्व दूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असून, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष करून त्र्यंबकेश्वर येथे तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने गोदावरीचे पाणी शहरात शिरून जनजीवन विस्कळीत झाले तसेच नदी काठच्या व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागले आहे. त्र्यंबकेश्वरच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या साठ्यात पाच टक्क्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कश्यपी, गौतमी गोदावरी हे धरणेही काठोकाठ भरली असून, आळंदी धरणात शंभर टक्के साठा झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरण समुहात ९५ टक्के पाणीसाठा आहे. या पावसामुळे जिल्ह्णातील लहान-मोठे अशा २४ धरणांपैकी आठ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यात आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांचा समावेश आहे. धरणे भरल्यामुळे नद्यांमध्ये त्याचे पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरण समूहात ९६ टक्के, तर गिरणा धरण समूहात ७८ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ८० ते ९० टक्के पाणी असले तरी, पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने गिरणा धरणात ५२ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णातील धरणांमध्ये ५२,१७७ दशलक्ष घनफूट इतके म्हणजे ७९ टक्के पाणी होते, यंदा ५१,५९९ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले असून, त्याची टक्केवारी ७८ इतकी आहे.सात धरणांतून विसर्गपावसाच्या संततधारेमुळे व धरण साठ्यात कमालीची वाढ झाल्याने जिल्ह्णातील गंगापूरसह सात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात गंगापूरमधून ३२१४, दारणा- १८५०, वालदेवी- १०५०, कडवा- २३२८, आळंदी- ६८७, पालखेड- १२०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, नांदूरमधमेश्वरमधून ३२,६९० क्यूसेक इतका विसर्ग मराठवाडा, नगरकडे सुरू आहे.जायकवाडीला ४५ टीएमसी पाणीनाशिक जिल्ह्णात जून व जुलै या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे चांगली भरली. गोदावरी, दारणा, कडवा या धरणांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी पाणी सोडण्यात आल्याने आजपावेतो मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ४५ टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे. रविवारी सकाळपासून गंगापूरमधून पाणी सोडल्याने तीन टीएमसी पाणी सोमवारी दुपारपर्यंत रवाना करण्यात आले आहे. जायकवाडी धरणाची क्षमता ८० टीएमसी इतकी असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक पाणी नाशिक जिल्ह्णातूनच रवाना झाल्याने धरणात ५६ टक्के पाणी साठा आहे.