शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ईद-ए-मिलाद’ची जय्यत तयारी उत्साह : रोषणाईने उजळला जुने नाशिक परिसर; घरोघरी सजावटीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:11 IST

हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या शनिवारी (दि. २) शहरात साजरा केला जाणार आहे.

ठळक मुद्दे मशिदींवरही आकर्षक रोषणाईविविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनअन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित

नाशिक : हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण येत्या शनिवारी (दि. २) शहरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध उपनगरांमध्ये पैगंबर जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळत आहे. विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळांकडून आपआपला परिसर सजविला जात असून, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.दरवर्षी इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ या उर्दू महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्रवचन तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य स्पर्धा (नात-ए-पाक) होणार आहेत. सलग बारा दिवसीय प्रवचनमाला वडाळारोडवरील शहीद अश्पाकउल्लाखान चौकातील मैदानात सुरू आहे. तसेच शनिवारी जुने नाशिक परिसरात सामूहिक अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी आपली घरे, दुकाने व परिसर रोषणाईने सजविला आहे. ठिकठिकाणी पैगंबरांनी दिलेला मानवतेचा व एकात्मतेचा संदेश व मदिना शरीफच्या प्रतिकृतींचे फलक उभारले जात आहेत. तसेच लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा फलक लावले जात आहेत. वडाळागाव, जुने नाशिक, देवळाली कॅम्प, देवळालीगाव, नाशिकरोड, सातपूर, सिडको आदी परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असून, परिसर विविध आकर्षक पद्धतीच्या रोषणाईने नटला आहे. हिरवे झेंडे, पताका, रोषणाई करून परिसर सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. जुने नाशिकसह वडाळागाव परिसरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती अवघ्या एका दिवसावर येऊ न ठेपली आहे. यानिमित्त जुने नाशिकसह परिसरात सजावटीच्या कामाला वेग आला आहे. यासाठी लागणारे विविध प्रकारचे आकर्षक हिरवे झेंडे, पताका, चमकी, विद्युत माळा आदी सजावटीच्या साहित्याने जुन्या नाशकातील बाजारपेठ गजबजली आहे. जुने नाशिकसह मेनरोड परिसरात विद्युत साहित्यविक्रीच्या दुकानांवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. जुने नाशिक भागात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत असून, ठिकठिकाणी देखावे उभारणी व सजावटीच्या कामाला वेग आला आहे. रात्री उशिरापर्यंत परिसरात तरुणांकडून सजावटीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.