शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आयशरचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:05 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील एका गावातून सिन्नरकडे येण्यासाठी आयशर टेम्पोत बसलेल्या विवाहितेवर मोह शिवारात निर्जनस्थळी टेम्पो थांबवून अत्याचार करणाºया आयशर-चालकास एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यात अटक केली. प्रदीप संतोष काळे (२५) रा. भाबरडा, ता.जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देनिर्जनस्थळी गाडी थांबवूून गाडीतच सदर महिलेवर अत्याचार केला

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील एका गावातून सिन्नरकडे येण्यासाठी आयशर टेम्पोत बसलेल्या विवाहितेवर मोह शिवारात निर्जनस्थळी टेम्पो थांबवून अत्याचार करणाºया आयशर-चालकास एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यात अटक केली. प्रदीप संतोष काळे (२५) रा. भाबरडा, ता.जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.पीडित विवाहिता आपल्या पाचवर्षीय मुलासह सिन्नर येथे येण्यासाठी सिन्नर-शिर्डी मार्गावर थांबली होती. सिन्नरजवळ आल्यानंतर आयशरचालकाने सिन्नर बायपासवरून नाशिकच्या दिशेने वेगात टेम्पो चालविला. सदरची बाब विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर तिने टेम्पोचालकास गाडी थांबविण्यास सांगितले असता त्याने मोह शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास निर्जनस्थळी गाडी थांबवूून गाडीतच सदर महिलेवर अत्याचार केला व महिलेला मुलासह उतरवून देत पळून गेला.घटनेनंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आयशरचालकाच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आयशर चालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नेमणूक करून तपासास सुरुवात केली होती. सदरच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव-गाव नसल्याने तसेच आयशर टेम्पोचा नंबरही नसल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. तपास पथकासह दिवसरात्र मेहनत घेऊन शिंदे येथील टोक प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आयशर टेम्पोचा नंबर प्राप्त करून घेतल्यानंतर तपासाची चक्रे फिरवून पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, पोलीस शिपाई सुनील जाधव यांच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील भाबरडा गावी सापळा रचून संशयित आयशरचालक प्रदीप संतोष काळे यास टेम्पोसह ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे करत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी