शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न व्हावा : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:21 IST

: मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच शारीरिक विकास हादेखील महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

नाशिकरोड : मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच शारीरिक विकास हादेखील महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.  मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॉमर्स मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर सायन्स कॉलेज नाशिक येथे ‘चला खेळू’ या कार्यक्रमात बोलताना झगडे म्हणाले की, या कार्यक्रमात जोपर्यंत व्यवस्थापन उतरत नाही तोपर्यंत हे अभियान पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना खेळाच्या मैदानात उतरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी हा शाळा-महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त वेळ असल्याने मुलांना खेळाचे महत्त्व पटविणे ही शाळा व महाविद्यालयांची जबाबदारी आहे. पुढची पिढी घडवायची असेल तर त्यांना खेळाचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे आहे, असे झगडे यांनी स्पष्ट केले.  यावेळी व्यासपीठावर उपायुक्त महसूल दिलीप स्वामी, क्रीडा उपसंचालक जयप्रकाळ दुबळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राचार्य शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.शारीरिक सुदृढता टिकवून ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. मुलांनी आपल्या दैनंदिन जीवनात खेळासाठी वेळे देणे आवश्यक आहे. खेळ आनंद तर देतोच, पण आपल्या शारीरिक क्षमताही वाढवितो. शालेय जीवनामध्ये कच्चा दुवा राहिल्यास त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर होतो. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शिक्षकांनीदेखील अभ्यास करून काळानुरूप स्वत:ची गुणवत्ताही टिकवणे महत्त्वाचे आहे, असेही झगडे यांनी सांगितले.