शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:00 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागासाठी औषध खरेदीच्या विषयावर चर्चेत सहभागी होताना अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तक्रारी केल्या.

ठळक मुद्देलीना बनसोड : जिल्हा परिषद सदस्यांनी वाचला गाºहाण्यांचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागासाठी औषध खरेदीच्या विषयावर चर्चेत सहभागी होताना अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तक्रारी केल्या.रुग्णालयातील डॉक्टर स्वत: क्वारंटाइन झाल्यावर पर्यायी वैद्यकीय अधिकारी नेमला जात नाही, उलट आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात येते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली.रुपांजली माळेकर, आत्माराम कुंभारडे, भास्कर गावित, नूतन आहेर आदींनी एनआरएचएमवर झालेल्या खर्चाची माहिती मिळत नसल्याचे सांगून, सर्व कामांची चौकशी करावी व मगच देयके अदा करावी, अशी मागणी केली. यावेळी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी १०८ रुग्णवाहिकेचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे व त्यांना त्यांचा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ४३ रुग्णवाहिका असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याने त्यावर उपाय म्हणून काही खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात येतील तसेच, मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाबाबत सदस्यांच्या असलेल्या तक्रारी विचारात घेऊन, लवकरच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल व त्यात ज्या सदस्यांची तक्रार आहे त्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊनच्या काळात ५० लाखांची कामे या सभेत नूतन आहेर, सिद्धार्थ वणारसे यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन असताना एका विशिष्ट गटात ५० लाखांची सेस निधीचे कामे कशी केली गेली असा प्रश्न विचारला. या कामांना कोणी मंजुरी दिली, कोणाच्या परवानगीने कामे झाली आणि एका महिन्यात ५० लाखांची कामे लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना कसे पूर्ण झाले अशा प्रश्नांची सरबत्ती केली. याच अनुषंगाने आहेर यांनी देवळा नगर पंचायत क्षेत्रात काम सुरू असताना सदस्य म्हणून आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सांगून या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देणे, कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका नसणे हे प्रकार सातत्याने घडत असून, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका संपर्क करूनही मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. राष्ट्रीय हेल्थ मिशन व आरोग्यवर्धिनीअंतर्गत सारखेच कामे केली जात असून, दोन्ही कामांचे देयके काढली जात असल्याची तक्रार यावेळी अनेक सदस्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल