शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नियंत्रणासाठी हंगामपूर्व लागवड टाळण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:14 IST

आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू  केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकºयांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.  

ठळक मुद्देकृषी विभागाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू बोंडअळी नियंत्रणासाठी हंगामपूर्व लागवड टाळण्याचा प्रयत्न उत्पादकांना एक जूननंतर शेतकऱ्यांपर्यंत बीयाणे पोहोचविण्याच्या सूचना

नाशिक : आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू  केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कापूस लागवड करावी यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.  घाऊक व किरकोळ विक्रेत्यांडून एक जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांना केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणेच १ जूननंतर उपलब्ध होणार असल्याने लागवडही एक जून नंतर होऊन शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालणे शक्य होईल ,असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कापसाच्या हंगामपूर्व लागवडीमुळे शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढतो. जीवनक्रम खंडीत न झाल्यामुळे  पुर्नउत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भाव वाढण्यास मदत होते. त्यामुळे यापूर्वीचा अनूभव लक्षात घेऊन महाराष्ट्रात हंगामपूर्व लागवडीचे प्रमाण अत्यल्प असले तरी कुठेही कापसाची हंगामपूर्व लागवड होऊन शेंदरी बोंड अळीला पोषक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी २०१९ च्या खरीप हंगामात बियाने उत्पादक कंपन्यांनी १५ मे २०१९ पर्यंत के वळ घाऊक व्यापाºयांना किंवा जिल्हास्तरावरील कंपनीच्या गोदामापर्यंत बियाणे पोहोचविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत केवळ घाऊक व्यापारी अणि कंपन्यांच्या गोदामापर्यंतच बियाण्यांची वाहतूक झाली असून बुधवारपासून(दि.१५)घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत बियाण्यांचा पुरवठा सुरू होणार आहे. मात्र एक जूनपूर्वी कोणताही घाऊक अथवा किरकोळ विक्रेता शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करणार नाही याची दक्षता सर्व कापूस बियाणे उत्पादन कंपन्यांनी घ्यावी अशा सूचना कृ षी आयुक्तालयामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात शेतकºयांना हंगामपूर्व लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध होणार नसल्याने शेतकºयांना कापसाची लागवड एक जूननंतरच करावी लागणार आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकcottonकापूस