नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाचे महानिर्देशक आर. आर. वर्मा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी करून सुरक्षतेचा आढाव घेतला.सकाळी पाहणी दौऱ्यापूर्वी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरा कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ व चार, रेल्वे मालधक्का, सिन्नर फाटा नवीन प्रवेशद्वार- बुकिंग कार्यालय, पादचारी पूल आदिंची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. तसेच यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी भुसावळ मंडल रेल प्रबंधक महेशकुमार गुप्ता, रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए. के. सिंग, अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक प्रणवकुमार, नाशिकचे पोलीस आयुक्त एस. जगनाथन, उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, रेल्वे कुंभमेळा अधिकारी देवदास दत्ता, वरिष्ठ मंडळ अभियंता पवन पाटील, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे प्रबंधक एम.बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर, रेल्वेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात भाबल, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाची दक्षता
By admin | Updated: July 19, 2015 00:53 IST