शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 20:35 IST

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या ...

ठळक मुद्दे ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापुररोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदिनॉमिक्स...आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम.जी.कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी आपल्या ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. तेव्हा सरकारने खर्च करण्यास सुरूवात केली; मात्र हा खर्च सर्वाधिक कल्याणकारी कामांवर करण्यात आला हे दुर्दैव. कारण कल्याणकारी कामांवर खर्च होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळाला आणि २०१४पर्यंत वित्तीय शिस्तीकडेही दुर्लक्ष झाले. २जी, ३जी, कॉमनवेल्थसारखे घोटाळे उघडकीस आले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. केवळ धोरणे दर्जेदार असून चालत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर२०१४ पासून आजपर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक विकसीत करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळक्ष अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था