शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

एमपीएससी परीक्षेवर कोरोनाचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:50 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही एमपीएससीची परीक्षा पार पडल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.

ठळक मुद्दे२ हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी १३ हजार ७३५ उमेदवारांची उपस्थिती

नाशिक : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही एमपीएससीची परीक्षा पार पडल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला कोरोनाच्या भीतीसोबतच विविध कारणांनी तब्बल दोन हजार १०७ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. या परीक्षेसाठी राज्यातून साधारण ९५ हजार परीक्षार्थी बसले होते. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दीड तास आधी प्रवेशपत्र, ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह केंद्रावर हजर होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये परीक्षार्थींमध्ये अंतर ठेवण्यात आले होते.गैरप्रकारमुक्त परीक्षामहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नाशिक शहरातील ४१ केंद्र्रांवर ही परीक्षा घेतली. त्यासाठी १ हजार २५० कर्मचारी कार्यरत करण्यात आले होते. कोणत्याही केंद्र्रावर कॉपी वा अन्य गैरप्रकार आढळून आला नाही. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा